हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्री उत्सव हा वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. यामध्ये शारदीय नवरात्रीला खास महत्त्व देण्यात येते. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये माता दुर्गाच्या 9 अवतारांची आराधना करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्रीला सुरुवात 15 ऑक्टोंबरपासून होणार आहे. तसेच, ती 23 ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. असे म्हणतात की, या नऊ दिवसाच्या काळात आपण जर देवीची मनोभावे पूजा केली तर देवी प्रसन्न होते. परंतु याकाळात आपण जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. यासाठी आपल्या हातून सतत चांगले कार्य घडणे आवश्यक आहे.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे – असे म्हणतात की, नवरात्रीच्या काळात 9 दिवस माता दुर्गा देवी पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपात वास करते. त्यामुळे आपण ज्या परिसरात ज्या ठिकाणी माता देवीचे आराधना करतो तिची पूजा करतो ती जागा सकारात्मक ऊर्जेने भरलेली असावी. आपण जर माता देवीची घरात पूजा करत असू तर घरात वाद होणार नाहीत, घरात कोणतीही अघटीत घटना घडणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. घर नेहमी सतत प्रसन्न राहील यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
तुटलेल्या मूर्ती फाटलेले कपडे घरात ठेवू नये – नवरात्रीच्या काळात आणि घटस्थापनेवेळी घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवायला हवे. घरामध्ये जर एखादी नकारात्मक ऊर्जा देणारी वस्तू असेल तर तिला आपण घराच्या बाहेर काढायला हवे. जसे की घरात तुटलेल्या मुर्त्या फाटलेले कपडे असतील त्याची आपण योग्यरीत्या विल्हेवाट लावायला हवी. अशा गोष्टी घरात ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो.
अन्नदान करा – साधुसंत आपल्याला नेहमी गोरगरिबांना अन्नदान करा असा सल्ला देताना दिसतात. कारण आपण गोरगरिबांना अन्नदान केले त्यांची भूक भागवली तर आपल्याला पुण्य मिळते. तसेच आपल्या घरात आनंद टिकून राहतो. त्यामुळे नवरात्रीच्या काळात देखील अन्नदान केल्यास देवीची कृपा आपल्यावर बनवून राहते. अन्नदान केल्यामुळे आपल्याला जे पुण्य लाभते त्याचा चांगला परिणाम आपल्या कुटुंबावर देखील होतो. तसेच, त्या पुण्याचा लाभ आपल्या मुलांना देखील होतो.
अंगण, घर स्वच्छ ठेवा – ज्या ठिकाणी देवीची पूजा मांडली जाते तो परिसर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. अशुद्ध जागेत नकारात्मक जागेत देवीची पूजा कधीही मांडू नये. ज्या ठिकाणी हवा खेळती राहील, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशा ठिकाणीच देवीची पूजा मांडली जावी. यामुळे घरातील वातावरण देखील आनंदी आणि निर्मळ राहते.
तुटलेल्या काचा ठेवू नका – नवरात्रीच्या काळात तुम्ही जर घरामध्ये तुटलेल्या काचा फुटलेल्या वस्तू घरात ठेवत असाल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. अशावेळी घरामध्ये कोणताही फुटलेला आरसा तुटलेल्या काचा ठेवू नये. अशा गोष्टी घरात असल्यास त्याची त्वरित विल्हेवाट लावावी. या सर्व गोष्टी केल्यानंतर आपोआप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होईल. तसेच घरातील वातावरण आनंदी आणि खेळते राहील. ज्यामुळे कुटुंबात निर्माण झालेले ताण तणाव देखील दूर होतील.