Dombivali News: कल्याण-डोंबिवली पालिकेसह लगतच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मागच्या दीड वर्षांपासून हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होता. मात्र आता महामंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी शहरापर्यंत प्रवास करू शकणार आहे.उलट दिशेने भिवंडीकडून डोंबिवलीपर्यंत (Dombivali News) प्रवास करू शकणार आहे.
जेष्ठ नागरिक आणि महिलांना लाभ
कल्याण महानगर परिवहन महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर या महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या भिवंडी पालिका, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, बदलापूर पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, महिलांना या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयुक्त, वाहतूक, परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत (Dombivali News) हा निर्णय घेण्यात आला.
जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास (Dombivali News)
कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसमधून (Dombivali News) पालिका हद्दीतील ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना केडीएमटीच्या बसमधून शनिवारपासून मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच बैठकीमध्ये महामंडळाचे पुढील नियोजन आणि धोरणात्मक निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. शुक्रवार पासून याची आमलबजावणी सुरू झाली आहे.
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका (Dombivali News) आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगर परिषद यांच्या एकत्रित सहभागामधून या क्षेत्राकरिता प्राधिकरण करून सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (केएमपीएमएल) या अभिनामाची कंपनी स्थापन करण्यास शासनाने १४ मार्चला मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)च्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (केएमपीएमएल) स्थापन केली आहे.