हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या अटकेत आहे. त्याने पॅरोलसाठी हाय कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान गवळी यांनी पॅरोल मागण्यामागचे कारण हे आपली पत्नी आजारी सांगितले आहे.
कुख्यात डॉन अरुण गवळी याने आपल्याला पॅरोल मिळावा यासाठी यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. मात्र, विभागीय आयुक्तांनी त्याचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर गवळी याने हाय कोर्टात धाव घेतली आहे.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही बजावली आहे. तसेच तसेच २९ एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान गवळी याने हाय कोर्टात धाव घेतली असून पॅरोलसाठी अर्जही केला आहे.