हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोग खटल्यातून मुक्तता झाली आहे. अमेरिकनं सिनेटनं ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. सिनेटनं ट्रम्प यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून, ट्रम्प यांचा विजय झाला आहे. रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.
अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय काळात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून त्यांना अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्या युक्रेनमधील व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले होते, त्यात त्यांनी अधिकाराचा दुरूपयोग केला असा पहिला आरोप आहे. त्यानंतर प्रतिनिधिगृहात या प्रकरणी महाभियोग चौकशी सुरू असताना व्हाइट हाऊसचे अधिकारी व इतर सहकाऱ्यांना समितीसमोर साक्ष देण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी पुरावे गोळा करण्यात बाधा आणली असा दुसरा आरोप आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.