पुन्हा सर्व काही बंद करायला लावू नका; अजित पवारांनी खडसावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असल्याने काळजी घ्यावी, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. मात्र दुर्देवाने आपल्या राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये करोना आजाराची भीतीच राहिलेली नाही. कुठे ही नियम पाळले जात नाही. आता सर्व संपले आहे असा काही लोकांमध्ये गोड गैरसमज झाला आहे. त्यामुळे तिथे रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे.

काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.

Leave a Comment