हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी विश्व चँपियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजीमुळे भारतीय सलामीवीर रोहित शर्माला अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत त्याचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, रोहित या दौऱ्यात आपल्या दमदार फलंदाजीने पुन्हा एकदा छाप सोडेल.
यावेळी दिनेश लाड यांनी रोहितला काही सल्ले देखील दिले आहेत. लाड म्हणाले, ‘या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध चांगली बॅटींग करत होता. त्याचा खेळ पाहून तो आऊट होणार नाही, असं वाटत होतं. मात्र त्यानं काही इनिंगमध्ये खराब शॉट खेळून विकेट फेकली. त्यानं इंग्लंडमध्ये ही चूक करु नये. त्यामुळे टीमचे नुकसान होईल.’
ते पुढे म्हणाले, रोहितला इंग्लंडमध्ये अधिक फोकस करावा लागेल. त्याने प्रत्येक बॉल त्याच्या मेरिटप्रमाणे खेळणे आवश्यक आहे. कारण, इंग्लंडमध्ये बॉल जास्त स्विंग होतो. त्यानं इंग्लंड विरुद्ध टर्निंग पिचवर खूप चांगली खेळ केला होता. त्या पिचवर अन्य बॅट्समनना बराच त्रास झाला. रोहित इंग्लंडमधील परिस्थितीनुसार खेळ करेल, असा मला विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.