हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुगलचे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला गुगलवर पाहिजे त्या गोष्टी बघता येतात. तसेच ऐकताही येतात. त्यातही भारतात इंटरनेटचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. मोबाईल फोनवर इंटरनेटचा वापर सर्वात जास्त होतो. तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. आणि यासोबत सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांची यामधून फसवणूक होताना दिसत आहे.
हॅकर्स इंटरनेटवर काही विशिष्ट शब्दांवरून फसवणूक करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. इंटरनेटवर काही शब्द सर्च केल्यानंतर तुम्ही जर काही विशिष्ट लिंकवर क्लिक केले तर तुमच्या डिवाइस मधील संपूर्ण वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीच्या हातात जाते. एका प्रोग्रामच्या मदतीने तुमचा कम्प्युटर देखील कंट्रोल केला जातो. अशी माहिती समोर आलेली आहे.
सायबर सिक्युरिटी कंपनीकडून याबाबत सावधानतेच्या इशारा देखील देण्यात आलेला आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे सध्या अनेक लोक google वर Are Bengal cat’s legal in australia? याबाबत मोठ्या प्रमाणात सर्च करत आहे. आणि यामुळे त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोस्ट होत आहे. तुम्ही जर ही माहिती सर्च केल्यानंतर तुमच्या सर्च रिझल्टमध्ये आलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक केले, तर तुमची वैयक्तिक माहिती जाण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर वरील शब्द google च्या सर्च बारमध्ये सर्च केले, तर हॅकर्स तुमच्या वैयक्तिक माहितीवर हल्ला करतात. याबाबत सावधानतेचा इशारा दिलेला आहे. युजरने कोणत्याही अवैध असणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. हॅकर सर्च बार मध्ये विशेषता ऑस्ट्रेलिया हा शब्द सर्च करणाऱ्या लोकांची फसवणूक होत आहे. ज्यावेळी युजर सर्च रिझल्टमध्ये काही अवैध लिंकवर क्लिक करतात. तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँकेची माहिती गुड लोडर नावाच्या प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने शेअर केली जाते. आणि त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होते.