सलमानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ऑनलाईन कसा पहायचा कळत नाहीये? मग लगेच जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमानचा हा चित्रपट उद्या म्हणजेच १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये जात येणार नाही. कारण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्या पद्धतीने चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांसाठी हि पहिलीच वेळ आहे. यामुळे राधे पाहण्यासाठीच्या अटी शर्ती माहिती असणे गरजेचे आहे. पण बऱ्याच लोकांना याबाबत अनेक शंका आणि प्रश्न पडले आहेत. मग यांचे निदान तर व्हायलाच हवे….

https://www.instagram.com/p/COwt6mTjfNh/?utm_source=ig_web_copy_link

राधे मुव्हीचे तिकीट कसे काढायचे? कसा पहायचा? एकालाच पाहता येणार का? घरातील साऱ्यांना पहायचा असेल तर वेगवेगळे तिकिट काढावे लागेल का? हे आणि असे अनेक प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडले आहेत. तर या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार. इतकेच नव्हे तर या माहितीसोबत काही ट्रिकही सांगणार आहोत, ज्यामुले तुमचे पैसे वाचणार आहेत. सलमानचा ‘राधे’ उद्यापासून झी प्लेक्स आणि झी ५वर पाहता येणार आहे. तसेच तुमच्या घरात असलेल्या डीश टीव्हीवर देखील पाहता येणार आहे. यासाठी डिश, डि२एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही यांच्यासोबत टायअप करण्यात आलेले आहे.

https://www.instagram.com/tv/COudzYLD6cK/?utm_source=ig_web_copy_link

यासाठी तुम्हाला एकतर झीचे प्रिमिअम पॅकेज घ्यावे लागेल. नाहीतर डीटीएचवर या सिनेमासाठी तिकिट विकत घ्यावे लागेल. या एका तिकिटाची किंमत २४९/- रुपये इतकी असणार आहे. ‘राधे’ जर झी ऍपवर पहायचा असेल तर एकावेळी एकालाच पाहता येणार आहे. राधे मुव्ही पाहण्यासाठी तुमच्याकडे झीचे सबस्क्रिप्शन नसेल तर त्यासाठी झीने एक मोठी ऑफर ठेवली आहे. ४९९ रुपयांच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला राधेचे एक तिकिट मिळणार आहे. पण जर तुम्ही आधीपासून सबस्क्रिप्शन घेतले असाल, तर तुम्हाला फक्त २४९/- रुपयांचे तिकिट काढावे लागणार आहे.

https://www.instagram.com/p/COcp60gjM2n/?utm_source=ig_web_copy_link

याविषयी काही महत्वाचे:-
१) राधेचे तिकीट घेतल्यानंतर तो तुम्हाला २१ दिवसांत कधीही पाहता येईल. मुख्य म्हणजे चित्रपट चालू केल्यापासून चार तासांत तो पाहून संपवावा लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वेळाने तुम्ही थोडा थोडा पार्ट पाहण्यासाठी प्रयत्न केलात आणि ४ तास उलटून गेले तर पुन्हा तिकीट काढावे लागणार आहे.
२)राधे मुव्हीचे एक तिकिट काढल्यास तुम्ही तो मुव्ही एकावेळी दोन डिव्हाईसवर पाहू शकणार आहात. यामुळे थिएटरमध्ये दोघांसाठी दोन वेगवेगळी तिकिटे काढावी लागतात त्याचे हे पैसे वाचणार आहेत.समजा राधे तुम्हाला खूपच आवडला व पुन्हा पहावासा वाटला तर तुम्हाला पुन्हा दुसरे तिकिट काढावे लागणार.

https://www.instagram.com/p/CN-DFSCH6Zo/?utm_source=ig_web_copy_link

३) दोनपेक्षा जास्त जणांना राधे पहायचा असल्यास स्मार्ट टीव्ही हा उत्तम पर्याय आहे. यावर एकदाच तिकिट काढून घरातील सदस्य, मित्रमंडळींसोबत तुम्ही राधे हा मुव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो देखील पाहू शकता.
४)जर तुमच्याकडे झीचे सबस्क्रिप्शन नाही आणि ४९९/- ऐवजी २४९/- रुपयांतच राधेचे तिकिट घ्यायचे असेल तर आणखी एक पर्याय आहे. तुमच्याकडे फ्लिपकार्ट असेल आणि तुम्ही गोल्ड मेंबर असाल तर तुम्हाला खरेदीवर सुपर कॉईन मिळतातच. त्यावर झी५ चे एका महिन्याचे ५० कॉईन देऊन सबस्क्रिप्शन मिळते. ते झी५ वर रजिस्टर करा आणि राधेचे तिकिट २४९/- रुपयांत डील करा.

https://www.instagram.com/p/COhzuIGDr58/?utm_source=ig_web_copy_link

 

५) हे तर झालं पण DTH वर कसे पहाल? टाटा स्काय – चॅनेल #२५२, #253, #254, #255 वर जाहिरात येते. डीटूएच – चॅनेल ९१७(HD), २०० (SD) (Screen १) आणि १९९ (स्क्रीन २) SD वर जाहिरात येते. डीश टीव्ही – चॅनेल ३०२ HD, ३०३SD (स्क्रीन १) and ३०१ SD (स्क्रीन २). एअरटेल डिजिटल – चॅनेल #२६९, #२७०, #४९९, #५०० या कंपन्यांच्या डीटीएचवर राधेचे तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही या चॅनेलवर दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊ शकता किंवा क्यू आर कोड, डीटीएच ऑपरेटरचे अॅप आणि वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तिकिट बुक करू शकता.
महत्वाचे….. डीटीएचवरसुद्धा तुम्हाला एका ठराविक वेळीच राधे पाहता येणार आहे. त्या चॅनेल ऑपरेटरला तुमचा ‘राधे’ पाहण्याचा सोईस्कर वेळ एसएमएसद्वारे कळवा आणि मग मस्त मुव्ही एन्जॉय करा.. ते हि संपूर्ण कुटुंबियांसोबत..

Leave a Comment