नक्षली हल्ल्यात दुरदर्शन चा कॅमरामन आणि दोन पोलीस मृत्युमूखी

IMG
IMG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दंतेवाडा | नक्षली कारवायांमुळे नेहमीच चर्चेत असणार्या छत्तीसगढ मधील दंतेवाडा येथे दुरदर्शन चा कॅमेरामॅन आणि दोन पोलीस यांचा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यु झाला अाहे.

छत्तीसगड मधे सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभुमीवर दुरदर्शन या राष्ट्रीय वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीची नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अच्युत्यानंद साहू असे मृत कॅमेरामन चे नाव असून अन्य जखमींना दंतेवाडा येथील रुग्नालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.