एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट; कापलेला पगार परत मिळणार आणि पगारात वाढही होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. महामारीच्या काळात त्याच्या पगारात आणि इतर भत्त्यांमध्ये केली गेलेली कपात लवकरच परत केली जाईल. यासोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. खरेतर, एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटा ग्रुपने पगार आणि भत्त्यांच्या रिस्ट्रकिचरिंग अंतर्गत आपल्या तीन विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रू यांच्या पगाराचे रिस्ट्रकिचरींग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता, ज्यामुळे पायलट आणि क्रू मेंबर्सची बेसिक सॅलरी, फ्लाइंग अलाउंस आणि लेओव्हर अलाउंस (आंतरराष्ट्रीय) कापला गेला. या प्रकरणाशी संबंधित टाटा ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,”कंपनी कर्मचाऱ्यांसाठी भत्ते, लीव्ह पॉलिसी आणि इतर उपाययोजनांवर विचार करत आहे.”

एअर इंडियामध्ये अनेक गुंतागुंत
अधिकाऱ्याने सांगितले की,”सरकारी कंपनी असल्याने एअर इंडियामध्ये या व्हेरिएबल्सबाबत अनेक गुंतागुंत आहेत. आता ते टाटा ग्रुपच्या विमान कंपन्यांच्या पॉलिसीशी जोडण्याची गरज आहे.” टाटा ग्रुपने अलीकडेच सरकारकडून एअर इंडियाचे अधिग्रहण केले आहे. विमान कंपनीत 12,085 कर्मचारी आहेत, त्यापैकी 8,084 पर्मनंट आहेत.

पगार आणि भत्त्यांची माहिती नाही
एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी सांगितले की,” पगार आणि भत्त्यांचे रिस्ट्रक्चरींग अद्याप लागू झालेले नाही.” या वैमानिकांमध्ये कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरचा समावेश आहे. त्यापैकी एकाने सांगितले की,”पगारातील कपात पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नवीन व्यवस्थापनात लवकरच पगार देण्यात येणार आहे.”

फ्लाईंग अलाउन्स मिळणार
पायलटने पुढे सांगितले की,”जानेवारीचा फ्लाईंग अलाउन्स फेब्रुवारीमध्ये देण्यात आला आहे. या आधी ते किमान तीन महिन्यांनी मिळायचे.” एका अधिकाऱ्याने सांगितले की,”एअर इंडियामधील पगार टाटा ग्रुपच्या इतर विमान कंपन्यांच्या स्ट्रक्चरनुसार असण्याची शक्यता आहे.” टाटा ग्रुपकडे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस व्यतिरिक्त एअर एशिया इंडिया आणि विस्तारा मध्ये मेजॉरिटी स्टेक (बहुसंख्य स्टेक) आहे.

सॅलरी स्ट्रक्चर एकसारखे असेल
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी स्ट्रक्चर गुंतागुंतीचे आहे. टाटा ग्रुप हे सुलभ करेल आणि त्यांच्या इतर एअरलाइन्सप्रमाणेच एक फ्रेमवर्क डेव्हलप करेल. या ग्रुपने एअर इंडियाचे परिचालन आणि सेवा दर्जा सुधारण्यासाठी 100 दिवसांची योजना सुरू केली आहे.

साथीच्या रोगाच्या काळात कापले गेले
महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या लेओव्हर अलाउन्स मध्ये 60-70 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. फ्लाईंग अलाउन्समध्ये 40 टक्के कपात करण्यात आली होती. यासाठी, जानेवारीमध्ये एअर इंडिया टाटा ग्रुपकडे सोपवण्यापूर्वी, त्यांच्या वैमानिकांनी एअरलाइनच्या माजी मॅनेजमेंटला पत्र लिहून कापलेला पगार परत करण्याची मागणी केली होती. कोविड-19 काळात करण्यात आलेली असमान वेतन कपात सुलभतेने परत आणावी, असे सांगण्यात आले.

Leave a Comment