एनी डेस्क ॲप डाऊनलोड केला अन् 10 लाखांचा फटका बसला 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील चणकवाडीच्या सेवानिवृत्त फौजदाराचा खात्यातून सायबर भामट्याने 10.24 लाख रुपये लांबवण्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली. एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करतात भामट्याने फौजदाराचे खातेच रिकामे केले.

चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदार तुकाराम मोहिते (63) यांचे एसबीआय बँकेत खाते असून गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एसबीआयचे ऑनलाईन ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी मोहिते हे मोबाईल मध्ये सर्चिंग करत होते. त्यांना गुगल वर एसबीआय चा हेल्पलाइन नंबर मिळाला त्या नंबर वर त्यांनी फोन केला. समोरुन मी एसबीआयचा अधिकारी बोलतोय असे सांगितले. बँकेचे ॲप डाऊनलोड करायचे असेल तर त्यापूर्वी एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करा असे मोहिते यांना सांगण्यात आले. त्यामुळे मोहिते यांनी एनी डेस्क ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सदर व्यक्तीने ॲप आयडी कोड विचारला बँकेचा अधिकारीच बोलत असल्याने मोहिते यांनी कोडही सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातील तब्बल 10 लाख 24 हजारांची रक्कम सायबर भामट्याने काढून घेतली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुकाराम मोहिते यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment