कराडमधील शेतकऱ्यांनो सधन कुक्कुट विकास गट स्थापन करायचाय? तर मग करा तात्काळ अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुपालन व इतर जोडव्यवसाय करता यावेत म्हणून पशु संवर्धन विभागाकडून अनेक योजना अमलात आणल्या जातात. त्याअनुषंगाने आता जिल्हा पशु संवर्धन विभागातर्फे सातारा जिल्ह्यात परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त कराड तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कराड येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

डॉ. अंकुश परिहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजने अंतर्गत 10 लाख 27 हजार 500 रुपये एकूण प्रकल्प किंमत आहे. सर्व प्रवर्गातील लाभार्थींना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. दिले जाणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थींने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारावयाचा आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी यांची वयोमार्यादा 18 ते 60 वर्ष राहील.

आजच्या काळात शेती करत असताना अनेकजण त्याच्याशी निगडित जोडधंदा सुरु करतात. शेतकरी मित्रानो, युमहालाही जोडव्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी सरकारी योजनांची माहिती मिळवायची असेल तर चिंता करू नका. Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही योजनांची माहिती मिळवू शकता. याशिवाय आसपास असणाऱ्या इतर शेतकऱ्यांशी, कृषीतज्ज्ञांशी संपर्कसुद्धा साधू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला पशुपालन आणि कृषी योजना पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला शेळी पालन, कुक्कुट पालनसाठीचे अर्थसहाय्य्य आदींसह इतर योजनांची माहिती मिळेल. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

कराड तालुक्यातील पशूपालक शेतकऱ्यांना या योजनेसाठी करायचा असेल तर अर्ज नमुना, जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीमिळू शकते. त्यासाठी कराड पंचायत समिती कार्यालयातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.