सातारा जिल्ह्यात लंम्पीमुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना 3 कोटी 77 लाखांचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगामुळे 1 हजार 456 पशूंचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या पशुपालकांना राज्य शासनाकडून 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये देण्यात आले आहे. हे अनुदान वाटप करण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानी असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

लंम्पी चर्म रोगामुळे सातारा जिल्हयातील 20 हजार 422 जनावरांना लागण झाली होती. लंम्पी चर्म रोगामुळे जिल्हयात 1 हजार 489 पुशधनाचा मृत्यु झाला होता. त्यापैकी 1 हजार 456 पशुधनास शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

लंम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजाराने जिल्हयातील 1 हजार 456 जनावरांचा मृत्यु झाला होता. खबरदारीच्या उपायोजनांमध्ये 100 टक्के म्हणजेच 3 लाख 47 हजार जनावरांचे लसीकरणही करण्यात आले होते. त्याचबरोबर लाळ खुरकुत या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणूनही 5 लाख 57 हजार 200 जनावरांचेही लसीकरण करण्यात आले आहे.

शेतकरी हे शेतीबरोबर एक शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पशुपालन करत असतात. जिल्हयात 1 हजार 456 जनावरांचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार अनुदानाच्या स्वरुपात भरुन काढले. या अनुदानामुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना नव्याने जनावरे खरेदी करण्यास मोठी मदत झाली आहे.