आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ; मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी केलं अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. पण यंदा कोरोनाचा संसर्ग परसू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन राज्य सरकारसह मुंबई पालिकेने केले आहे.

चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment