नवी दिल्ली । एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, कमी लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांनी सुरुवातीच्या काळात स्टिरॉइड्स टाळले पाहिजेत. कारण सुरुवातीच्या काळात स्टिरॉइड्स घेतल्याने शरीरावर चुकीचे परिणाम होऊ शकतात. एम्सचे संचालकांचे म्हणणे गृहीत धरले तर ज्यांना ‘मध्यम लक्षणे’ आहेत त्यांना नक्कीच ऑक्सिजन, स्टिरॉइड्स आणि औषधाची आवश्यकता आहे. स्टिरॉइड्स घेणार्या सौम्य लक्षण असणाऱ्या कोविड -19 रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू शकते आणि यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
केवळ मध्यम लक्षणांमध्येच स्टिरॉइड्स घ्या
एम्सचे प्रमुख म्हणाले, ‘सुरुवातीच्या टप्प्यात स्टिरॉइड्स घेतलेल्या रुग्णांना न्यूमोनिया होऊ शकतो. स्टिरॉइड्स केवळ मध्यम आजारांच्या बाबतीतच घ्यावीत, डॉक्टरही असाच सल्ला देतात. त्यांनी सांगितले की जर 93 च्या खाली ऑक्सिजनची पातळी असेल, जास्त थकवा, छातीत दुखणे अशी लक्षणे असल्यास होम आयसोलेशनमध्ये राहणा-या रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करावे. अशा रुग्णांनी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. उच्च जोखीम असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मध्यम लक्षणांमधील केसेसमध्ये तीन पर्याय
गुलेरिया पुढे असे म्हणाले की मध्यम आजारांच्या बाबतीत तीन प्रकारचे प्रभावी इलाज आहेत ते म्हणजे ऑक्सिजन थेरपी, स्टिरॉइड्स आणि अँटीकोआगुलंट्स. एम्सच्या प्रमुखांनी सौम्य कोविड-19 प्रकरणातील सीटी स्कॅनबाबतही इशारा दिला आहे. ते म्हणाले, त्याचे दुष्परिणाम आहेत आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून त्यांनी सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी सिटी स्कॅन न करण्याचा सल्ला दिला आहे.