कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते धार्मिक विधी करून रोलरचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे उपसरव्यवस्थापक आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, केन मॅनेजर एन. जे. कदम, मुख्य शेतकरी अधिकारी आर. जे. पाटील, डिस्टीलरी इन्चार्ज व्ही. जी. म्हसवडे, विशेष कार्यकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मनुष्यबळ विकास अधिकारी एस. एच. भुसनर, सुरक्षा अधिकारी जे. पी. यादव, राज्य सहकारी बँकेचे अधिकारी डी. बी. मोहिते यांच्यासह चोरे, धावरवाडी, इंदोलीसह परिसरातील ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.