डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिको कंपनीसोबत सामंजस्य करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बियाणे क्षेत्रातील महिको कंपनी यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. बौध्दिक संपदा हक्कासह विविध संशोधन प्रकल्पांना या करारामुळे गती मिळेल. असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.

डॉ. येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भालचंद्र वायकर, ‘डीएसटी फिस्ट’ प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महिकोचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. भारत आर. चर आणि वैज्ञानिक डॉ. स्मिता व्ही. कुरूप यांचीही उपस्थिती होती.

करारांतर्गत महिको आणि विद्यापीठ यांच्यात बौद्धिक संपदा हक्क संशोधन प्रकल्पासंदर्भात आदान-प्रदान करण्यात येणार आहे. कपाशीवर वडणारे रोग, सोईल ॲग्रोनिक कार्बन तसेचउपग्रहाच्या माध्यमातून संशोधन करण्यात येणार आहे. महिकोच्या उषा बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर करार करण्यात आला. आगामी तीन वर्षे या कराराची मुदत असेल. विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. सूर्यवंशी आणि डॉ. देशमुख यांनी तर महिकोच्या वतीने डॉ. चर, डॉ. कुरूप यांनी स्वाक्षरी केली.

Leave a Comment