दोन लसीचे डोस घेतलेल्यांना निर्बंधात शिथिलता देणार – राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना फिरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती डॉ. टोपेंनी आज दिली.

यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, राजेश टोपे म्हणाले की, राज्यात अजून १०० ते १२० दिवस महत्वाचे आहेत. कोरोनाचे संकट अजून टळलेल नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरदारी घेणे गरजेचे आहे. राज्यात सरकारच्यावतीने टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट दिली जात आहे. राज्यात असलेल्या विमानतळांवर प्रवाशांचा कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केले जायचे. मात्र, आता वेगळी परिस्थिती आहे. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत आहोत.

दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यातील लोकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजून किमान दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारकडून लस उपलब्ध होणे आवश्यक आहे.

केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी  2 लाख 17 हजार 522 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दि. 21 जुलै 2021 रोजी 1 लाख 6 हजार 190 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment