Saturday, February 4, 2023

डॉ. सुरेश भोसलेंचा कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मानपत्राने शिवम्ं प्रतिष्ठानतर्फे सन्मान

- Advertisement -

कराड | कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात केलल्या अतुलनीय कार्याबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा घारेवाडीतील शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मान २०२२ देवुन जोरहाट-आसाम येथील पद्मश्री जादव पाईंग यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख, अध्यक्ष राहुलकुमार पाटील, विजयालक्ष्मी शेट्टी, विश्वस्त, सदस्य, विभाग प्रमुख, तरुण-तरुणी उपस्थित होत्या.

डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात मोठे काम केले. अनेकांचा जीव वाचवण्यास मदत झाली. त्या कामाबद्दल अनेक संस्था, संघटनांनी पुरस्कार देण्यासाठी निमंत्रीत केले होते. मात्र मी कुठेही गेलो नाही. बलशाली भारत घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवम्ं प्रतिष्ठानचे दिलेले मानपत्र, पुरस्कार मी स्विकारला. प्रतिष्ठानच्या चांगल्या कामासाठी पाठीशी कृष्णा समुह कायम राहिल. बलशाली भारत घडवण्यासाठी तरुण पिढीला सुसंस्कारीत करण्याचे काम शिवम्ं प्रतिष्ठान इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. ही देशासाठी फार मोठी बाब आहे.

- Advertisement -

कोरोना काळात मोठे भितीचे वातावरण होते. या जिल्हयात शासकीय रुग्णालयात नव्हते त्यावेळी पहिल्यांदा ६० बेड कोरोनासाठी उपलब्ध करुन दिले. हॉस्पीटलमार्फत ६० बेडपासुन ५०० बेड वाढवुन आम्ही वाढवुन रुग्णांना चांगली सेवा दिली. सुरुवातीच्या काळात या आजारामुळे कोणीही एकमेकांच्या संपर्कात येत नव्हते. अशा स्थितीतही हॉस्पीटलमधील सेवकांनी रुग्णांना चांगली सेवा दिली. रुग्णांना सेवा देताना हॉस्पीटलमधील १६७ सेवकांनाही कोरोना झाला. तरीही त्यांनी न डगमनगता औषधोपचार घेवुन पुन्हा कामावर हजर होवुन रुग्णांना सेवा दिली. हा संस्कार आम्ही हॉस्पीटलमध्ये रुजवला आहे. विठ्ठल मोहिते यांनी मानपत्राचे वाचन केले.