यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे डॉ. इद्रजित मोहिते यांच्या घरासमोर महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेकडून (Dr. Yashwantrao Mohite Patsanstha) सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो ठेवीदार शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे दिले जात नाहीत. मुदत संपलेल्या ठेवीसुद्धा ठेवीदारांना परत केल्या जात नाहीत. म्हणून पतसंस्थेचे संस्थापक डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थासमोर महाराष्ट्र दिनी ठेवीदारांसह धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Farmers Association) केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी पंजाबराव पाटील म्‍हणाले, ” डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. यासंदर्भात सातारा जिल्हा निबंधक आणि जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांकडेही पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे संचालक मंडळांवर गुन्हा दाखल करून ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करण्याची व्यवस्था करण्यात यावी”.

या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे) कराडमधील डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दिलेल्या निवेदनावरती जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम खबाले, तालुका अध्यक्ष पोपट जाधव, किशोर पाटील, सागर कांबळे, अविनाश फुके, भगवान पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Comment