ड्रेगन फ्रुट आता कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांची नामांतराची घोषणा

वृत्तसंस्था | सध्या नामांतराचे वारे जोराने वाहू लागले आहे. अशात आता भाजपकडून ड्रेगन फ्रुट या फळाचे नांमातरही करण्यात आले आहे. ड्रेगन फ्रुट नावाचे फळ इथून पुढे कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

राज्य सरकारने ड्रेगन फ्रुटचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रेगन फ्रुटचा भाय्य भाग कमळासारखा दिसतो. त्यामुळे या फळाचे नाव कमळम असे ठेवण्याय येत आहे अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या नामांतरावरुन राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशात गुजरात सरकारची ही घोषणा ऐकुन महाराष्ट्रातही अशा नामांतराचे वारे वाहणार नाही ना हे आता येणारा काळच सांगेल.

You might also like