Drdo Apprentice Recruitment 2024 | नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आलेली आहे. आपल्याकडे असे अनेक पदवीधर विद्यार्थी आहेत. त्यांना नोकरीच्या संधी मिळत नाही. त्यांच्यासाठीच ही आज नोकरीची एक नवीन संधी आलेलो आहोत.
ती म्हणजे आता संरक्षण संशोधक आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ हैदराबादच्या ॲडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरी येथे पदवीधर तंत्रज्ञान आणि ट्रेड शिकवू उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहे. या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस आहे. त्याच प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता
डीआरडीओ भरती 2024 रिक्त जागा
- या भरतीमध्ये तब्बल 90 रिक्त जागांची पदे भरली जाणार आहेत
- पदवीधर प्रशिक्षणार्थी – 15 जागा
- तंत्रज्ञ डिप्लोमा – 10 जागा
- ट्रेड आयटीआय – 65 जागा
पात्रता निकष | Drdo Apprentice Recruitment 2024
पदवीधर शिकाऊ तसेच तंत्रज्ञ शिकाऊ या पदांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे ट्रेंड अप्रेंटिस यासाठी पात्र होण्यासाठी नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. नोंदणी नसलेले उमेदवार नाकारले जातील.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करायचा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईट ला जावे लागेल.
- होम पेजला गेल्यावर करिअर ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट टेक्निशियन अँड ट्रेड अप्रेंटिस इन हैदराबाद फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर ती प्रत डाऊनलोड करायची आहे. आणि फॉर्मची देखील प्रती घ्यायची आहे.
- त्यानंतर तुम्ही हा अर्ज भरा तसेच आवश्यक कागदपत्रे जोडा आणि पोस्टाने तो दिलेल्या पत्त्यावर पाठवा.