कोरोना बरोबर लढण्यासाठी डीआरडीओने बनवला नवीन व्हेंटिलेटर;४ ते ८ लोक वापरू शकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) देखील कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी दूरध्वनी मुलाखतीत सांगितले की गेल्या १०-१५ दिवसात आम्ही २० हजार सॅनिटायझरच्या बाटल्या बनवल्या आहेत. त्यासह सुमारे ३५ हजार मास्क देखील तयार केले गेले आहेत. आजपासून उत्पादन सुरू झाले आहे.१० ते २० लाखांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते म्हणाले, सर्वात महत्वाचे म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता. त्यासाठी कच्चा माल उपलब्ध असणे आवश्यक आहे.पुढील आठवड्यापासून व्हेंटिलेटरचा पुरवठा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

रेड्डी म्हणाले की व्हेंटिलेटरच्या काही भागांमध्ये समस्या आहेत. बीईएल आणि इतरही याचे उत्पादन करण्यास सुरवात करतील. पुढील महिन्याभरात १०,००० व्हेंटिलेटर तयार केले जातील. महिंद्रा आणि इतर कंपन्यांना तंत्रज्ञान देण्यात येईल. त्यांनी सांगितले की मागील ४ दिवसात आपल्या वैज्ञानिकांनी असे व्हेंटिलेटर विकसित केले आहे, ज्याचा वापर ४ ते ८ लोक करू शकतात. दोन महिन्यांत असे ३० हजार व्हेंटिलेटर तयार केले जातील आणि आम्ही ते पुरवण्यास सक्षम होऊ.

डीआरडीओ प्रमुख म्हणाले की, आयआयटी हैदराबादने यावरही काही संशोधन केले आहे, जर यशस्वी झाले तर ते ३० हजाराहून अधिक व्हेंटिलेटर बनवू शकतात. ही भूल देणारी वेंटिलेटर आहे. एकाची किंमत सुमारे ४ लाख रुपये असेल.कोरोनाव्हायरस देशात आपला पाय वेगात पसरत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाव्हायरसच्या ८७३ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत या विषाणूची १४९ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचवेळी या विषाणूमुळे १९ लोकांचा जीव गेला आहे. तथापि, या रोगातून ७९ लोक बरे झाले आहेत किंवा त्यांची प्रकृती सुधारत आहे याबद्दल काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment