व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ड्रीम 11 वर बंदी येणार ?? पोलिसांकडून कारवाईची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोबाईल वरून ऑनलाइन पध्दतीने रमी किंवा ड्रीम 11 खेळणाऱ्या बहुतांश लोकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. कारण तुम्ही खेळत असलेले ड्रीम्स 11, रम्मी या खेळांसाठी वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर केंद्र सरकार वा राज्य सरकारनं प्रमाणित केलं नसल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

त्यामुळे ऑनलाइन गेमवर कारवाईसाठी (सध्याच्या जुन्या आणि कमकुवत) कायद्यात बदल करण्याची मागणी नाशिक पोलिसांनी विधानसभा सदस्य समितीकडे केली. हीच मागणी आता पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली जाणार आहे.

दरम्यान, देशभरात ड्रीम 11 खेळणारे अनेक लोक आहेत. अनेक मुले या app च्या माध्यमातून पैसे कमवतात. त्यामुळे ड्रीम 11 वर बंदी आली तर गेम खेळणाऱ्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल.