हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीमुळे आणि सगळ्यात बाहेरचे खाल्ल्यामुळे लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू लागली आहे. अनेक लोक खूप कमी वयात हाय कोलेस्ट्रॉलचे (High Cholesterol) शिकार होत आहेत. त्यामुळेच अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी असे गंभीर आजार उद्भवत आहेत. परंतु तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचे शिकार व्हायचे नसेल तर तुमची लाईफस्टाईल बदलावी लागेल. यासह पुढे देण्यात आलेला घरगुती उपाय दररोज करावा लागेल. ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहील.
आपल्याला बाहेरच आहे की घरगुती मसाल्यांमध्ये हळद सर्वात आयुर्वेदिक औषध आहे. हळदीमुळे जशी जखम बरी होते तसेच शरीराच्या आतील आजार आणि समस्या ही दूर होतात. त्यामुळेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर हळदीचे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. हळदीचे गाणे शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकते. याच हळदीमध्ये अनेक गुणकारी तत्वे असतात. त्यामुळे हळदीचे पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते.
असे प्या हळदीचे पाणी
दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यात चिमूटभर हळदीची पावडर टाका. त्यानंतर हे पाणी चांगले ढवळून त्याचे सेवन करा. लक्षात घ्या की या पाण्याचे सेवन रोज रिकाम्या पोटी करावे लागेल. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतील. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ही वाढणार नाही. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये म्हणून तुम्ही अति तेलकट पदार्थ खाणे देखील टाळावे. यासह पालेभाज्या आणि कडधान्य आहारात घ्यावीत.