गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचं अजब विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : नेहमीच आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमुत्राचा अर्क घेतल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होत असल्याचं त्यांनी म्हटलं. “मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हंटल.

प्रत्येक व्यक्तीनं पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे. असं केल्यास अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासणार नसल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी भोपाळमध्ये १ कोटी वृक्षारोपणाची घोषणा केली. तसंच ही झाडं जगवण्यासाठी पाण्याच्या टँकर्सचीही व्यवस्था केली जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

या संकटाच्या प्रसंगी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. कोरोनाशी संबंधित गाईडलाईन सर्वांनी पाळली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.

Leave a Comment