Friday, January 27, 2023

आजपासून Driving License संबंधीच्या नियमांमध्ये बदल; टेस्टसाठी फॉलो करावे लागतील ‘हे’ नियम

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसेच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. आता वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केला आहे,

या नियमानुसार रजिस्टर्ड ड्रायव्हिंग सेंटर्समधून यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. फक्त व्यक्ती ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून ट्रेनिंग घेईल, ते ड्रायव्हिंग सेंटर पूर्णपणे मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे. या सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच तुम्हाला लायसन्स मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे तुम्हाला आता RTO मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आजपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

ड्रायव्हिंग सेंटर्ससाठी गाइडलाइन्स
ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टची पूर्ण प्रोसेस ऑडिटसाठी इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, ड्रायव्हिंग टेस्टसाठी अशाच ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता दिली जाणार आहे जे गाइडलाइन्सचे पालन करतील. या गाइडलाइन्सनुसार,ड्रायव्हिंग सेंटर्सकडे जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक आणि बायोमेट्रिक सारख्या फॅसिलिटी असणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग सेंटर्सनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांना मान्यता देण्यात येणार नाही. तसेच एखाद्याने मान्यता नसलेल्या ड्रायव्हिंग सेंटरमधून टेस्ट पास केली, तरी त्याला लायसन्स मिळणार नाही.