सरकारच्या या योजने अंतर्गत ड्रोन घेण्यासाठी मिळणार 4 ते 5 लाखाचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Drone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता यावी. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना आणत असतात. आजकाल कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण आणि डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सरकार अनुदान देत असतात. त्यांना पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी मदत होते.

अशाच प्रकारची एक नवीन योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. या योजनेचे नाव ड्रोन अनुदान योजना असे आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायदेशीर आहे. पिकांवर कीटकनाशके फिरण्यासाठी ड्रोन फायद्याचा ठरतो. परंतु रोजगार निर्मितीला देखील यामुळे चालणार नाही. यासाठी केंद्रशासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातून दोन घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. या अंतर्गत 100 ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यसाठी आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था व कृषी आणि सत्संग पदवीधर लाभार्थी यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. या अंतर्गत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादन कंपनी यांना जोड खरेदीसाठी जवळपास 40% म्हणजे 4 लाखांपर्यंत अनुदान सरकारकडून मिळणार आहे. त्याचप्रमाणे कृषी संबंधित पदवीधर असेल तर त्यांना 50% म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे महिला शेतकऱ्यांना 50% अनुदान म्हणजेच 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40 टक्के म्हणजे 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

ड्रोनचा फायदा कसा होणार

पिकांवर जर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा तो होऊ नये यासाठी पिकांवर फवारणी करत असतात. परंतु ही फवारणी करण्यासाठी जर जास्त वेळ लागत असेल, तर तुम्ही ड्रोनचा वापर करू शकता. यामुळे पिकांवर फवारणी करणे सोपे झाले आहे. ड्रोनची माहिती घेऊन शेतकरी स्वतः देखील फवारणी करू शकतात. किंवा तज्ञ प्रशिक्षण चालकांकडून देखील फवारणी करून घेऊ शकतात. या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होते.