नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळणार, खासदार जयसिध्देश्वर महाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सोलापूरचे खासदार शिवाचार्य जयसिध्देश्वर महाराज यांनी नान्नज,मोहीतेवाडी, रानमसले शिवारात जाऊन नुकसानग्रस्त द्राक्षे, कांदा, सोयाबीन, मका, फळबागा यांची पाहणी केली. यावेळी रानमसलेतील शेतकरी औदुंबर दामोदर गरड यांच्या या शेतातील अवकाळी पावसाने सडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जयसिध्देश्वर यांनी केली.

या पाहणी दरम्यान तहसिलदार जयवंत पाटील व तालुका कृषि अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, कृषि सहाय्यक सुवर्णा नडगिरे, तलाठी सोमीनाथ गवळी यांना नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावे व ओढ्या लगत असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या विहीरी पाण्याच्या प्रवाहात ढासळल्या आहेत त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश जयसिध्देश्वर यांनी अधिकाऱ्याना यावेळी दिले.

Leave a Comment