Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान पुन्हा एकदा पोहोचला NCB कार्यालया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईतील क्रूझ शिपवरील ड्रग पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खान शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) समोर हजर झाला. कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर आज शाहरुख खानचा मुलगा असलेल्या आर्यनची ही पहिलीच हजेरी होती. खरं तर, आर्यन खानला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या 14 अटींपैकी एक म्हणजे त्याला दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत NCB कार्यालयात हजेरी लावावी लागेल. उच्च न्यायालयाची हीच अट पूर्ण करण्यासाठी आर्यन खान आज NCB कार्यालयात हजर झाला.

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जवळपास 26 दिवस आर्थर रोड तुरुंगात घालवल्यानंतर ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबरला तो तुरुंगातून सुटला आणि मन्नत येथील त्याच्या घरी पोहोचला.

आर्यनला जामीन देताना हायकोर्टाने 14 अटी घातल्या आहेत
आपल्या आदेशात उच्च न्यायालयाने आर्यन खान आणि सहआरोपी अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना जामिनावर सोडताना 14 अटी घातल्या आहेत. कोर्टाने आर्यन खानला सांगितले की,”तो कोणत्याही सहआरोपीला भेटणार नाही किंवा बोलणार नाही. पुराव्यांसोबत छेडछाड न करण्याच्या सूचनाही कोर्टाने आर्यनला दिल्या आहेत. यासोबतच उच्च न्यायालयाने आर्यन खानला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे.” आर्यन खानला दर शुक्रवारी दुपारी 11 ते 2 या वेळेत मुंबईतील NCB कार्यालयात जाऊन आपली उपस्थिती नोंदवावी लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान NDPS कोर्टाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ शकत नाही.

आर्यन खानला NCB ने 2 ऑक्टोबर रोजी केली होती अटक
शाहरुख खानचा मुलगा असलेला आर्यन खान (23) आणि इतर काही जणांना NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्‍यावर गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ शिपवर छापा टाकून अटक केली होती. क्रूझमधून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा एजन्सीने केला आहे. आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थ बाळगणे, वापरणे आणि तस्करी करणे या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आर्यन आणि मर्चंट 8 ऑक्टोबरपासून अर्थन रोड कारागृहात बंद आहेत. त्याचवेळी धामेचा 8 ऑक्टोबरपासून भायखळा महिला कारागृहात बंद आहे.

Leave a Comment