Drugs Medicine Become More Expensive | आता डोकेदुखी होत नसते वाढत असते, 800 पेक्षा जास्त औषधांचे वाढणार दर

Drugs Medicine Become More Expensive
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Drugs Medicine Become More Expensive | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी प्रत्येक गोष्टींमध्ये महागाई वाढलेली दिसत आहे. घरातील अगदी साधा बाजार घ्यायचा असला तरी देखील त्या वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्याचप्रमाणे आता औषध उपचारांवर देखील चांगलेच महागाई वाढलेली आहे. अशातच 1 एप्रिलपासून काही औषधांवरचे दर वाढणार आहे. यामध्ये पेनकिलर किंवा अँटिबायोटिक यांसारख्या औषधांचा समावेश आहे. ही औषधे आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमीच लागतात. अशा औषधांवर दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला हा अतिरिक्त भार पडणार आहे. यामध्ये डोकेदुखीची गोळी देखील आहे. त्यामुळे आता सर्व सामान्य माणसाला डोकेदुखी देखील परवडणार नाही. वार्षिक भाववाढ किंमत निर्देशांकानुसार सरकारकडून या दरवाढीला मंजुरी मिळू शकते. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे फार्मा इंडस्ट्री औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत होती.

किती किंमत वाढणार

केंद्र सरकार .0055 टक्के दरवाढ करण्यास मंजुरी देणार आहेत. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय अभियान अंतर्गत औषधांच्या किमती गेल्यावर्षी आणि 2022 मध्ये रेकॉर्ड ब्रेक झाल्या होत्या. या 12 टक्के आणि 10 टक्के एवढी दरवाढ झालेली होती.

८०० पेक्षा अधिक औषधे होणार महाग | Drugs Medicine Become More Expensive

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक औषधांच्या किमती महागल्या आहेत. परंतु आता औषधांसाठी ग्राहकांना आणखी पैसे देखील मोजावे लागणार आहे. जी राष्ट्रीय यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यात 800 पेक्षाही अधिक औषधांचा समावेश आहे. त्यामुळे आता त्या औषधांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीत त्या औषधांचा समावेश आहे. ज्याचा सामान्यपणे जास्त प्रमाणात वापर होतो. या औषधांच्या किमती सरकारच्या नियंत्रणात असतात. औषधांच्या किमती कंपनी एका वर्षात केवळ 10 टक्केपर्यंत वाढवू शकतात. या औषधांमध्ये कॅन्सरच्या काही औषधांचा देखील समावेश आहे.

कोणत्या औषधांचा भाव वाढणार

या यादीत पॅरासिटॅमॉल सारखी औषधे माहिती अँटिबायोटिक्स, अनिमिया औषधे जीवनसत्वे यांचा समावेश असणारी औषधे पण यामध्ये समावेश होणार आहे त्यामुळे आता अनेक औषधांच्या दरामध्ये वाढ होणार आहे.