संतापजनक ! दारूच्या नशेत मुलाने मुसळाने मारहाण करून जन्मदात्या आईचाच घेतला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – पोटच्या मुलानं दारूच्या नशेत जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्यामुळे वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला आहे. हि संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील चौसाळा गावामध्ये घडली आहे. या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याचे समजताच मुलाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अखेर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.

मृत वृद्ध महिलेचे नाव प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे असे आहे तर मदन पांडुरंग मानगिरे असे नराधम आरोपी मुलाचे नाव आहे. दारुच्या नशेत असणाऱ्या आरोपी मदन मानगिरे याने मयत आई प्रयागबाई यांना, रात्री 11 ते 12 च्या दरम्यान लाकडी मुसळाने जबर मारहाण केली. या मारहाणीत प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही बाब आज सकाळी आरोपी मदनच्या लक्षात येताच, त्याने घरातून पळ काढला.

हा आरोपी बीड-गेवराई मार्गे महाकाळा येथील सासरवाडीत पोहचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता. मात्र, याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच त्यांनी शहागड येथून आरोपी पांडूरंग याला ताब्यात घेतले. तसेच एक बाइकदेखील ताब्यात घेतली आहे. या आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेकनूर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहे.

Leave a Comment