अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका टोळक्याने रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली आहे. अमरावती शहरातील सरोज चौक परिसरामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या कन्हैया रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी हॉटेल मालकाशी हूज्जत घालून रेस्टॉरंटची तोडफोड केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) February 15, 2022
हि घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. या आरोपी टोळक्यांनी रेस्टॉरंटमधील कम्पुटरसह इतर साहित्यांची तोडफोड केली आहे. तसेच आरोपी दुकानातुन पैसे चोरून पसार झाले आहेत. तोडफोडीची हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहे. हे आरोपी कोण होते आणि वाद झाल्याने त्यांनी रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली की चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.