सांगली । मिरज शहर पोलिस स्टेशन आवारात मद्यधुंद अवस्थेत असलेला सर्फराज जमखंडीकर याने तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी मिरज शहर पोलिस ठाण्यात आला. त्याची तक्रार घेतल्यानंतर तिघांना अटक लवकर करा असे म्हणून तो बाहेर जावून त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न करीत असतना पोलिसांनी तात्काळ पळत जावून त्याला लागलेली आग विझविली. त्याला लगेच शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जमखंडीकर हा पन्नास टक्के भाजला असून पोलिस कर्मचार्याचाही हात भाजला आहे. सर्फराज यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सर्फराज जमखंडीकर हा मद्यधुंद अवस्थेत मिरज शहर पोलिस ठाण्यात आला. त्याने आमची तक्रार आहे असे सांगितले. त्यांने अबुबकर बागवान व यासीन आणि आयुब या तिघांच्या विरोधात मारहाणीची तक्रार घेण्यात सांगितले.
जमखंडीकर यांची पोलिसांनी तक्रार घेतली. मारहाण करणारे तिघेही बोकड चौकात असल्याचे जमखंडीकर यांनी सांगितले. तसेच बोकड चौकात पोलिस कर्मचारी पाठवून दिले. परंतु चौकामध्ये कोणीही नसल्याने पोलिसांनी तुम्ही सकाळी या असे सांगितले.
जमखंडीकर हा मद्यधुंद अवस्थेत दंगा तसेच आरडाओरड करत बाहेर गेला. त्यांना अत्ताच अटकच करा म्हणून त्याने पत्नीजवळ असलेली पेट्रोलची बाटली बाटली अंगावर ओतून मॅचीसने पेटवून घेतले. नशेमध्ये पेटवून घेतल्याचे भडका उडाला. त्यावेळी ठाणे अंमलदार पोहेकॉ वाघमोड़े व पोकॉ कोळेकर यांनी त्याचे अंगावरील कपड्यास लागलेली आग गोणपाटाने विझविण्याचा प्रयत्न करुन त्याचे अंगावरील पेटते कपडे फाडुन काढुन पाणी ओतुन आग विझवली. दरम्यान ठाणे अंमलदार वाघमोडे यांचे हाताचे अंगट्यास भाजले आहे. सरफराज महंमदअली जमखंडीकर यांस सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.