उद्योजक ‘डीएसके’ यांच्यासह पत्नी, मुलाला सांगली पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । गुंतवणूक रकमेला व्याज तसेच वस्तू खरेदीवर सवलतींचा वर्षाव करून सांगलीकरांना पावणेपाच कोटीचा गंडा घालणार्‍या उद्योजक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यासह पत्नी व मुलाला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. सांगली शहर पोलिस ठाण्यात या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा आहे. अटक केलेल्यांमध्ये डिएसके, त्यांची पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांचा समावेश आहे.

दरम्यान डिएसके ग्रुपने सांगलीत कार्यालय थाटले होते. गुंतवणूक रकमेला व्याज आणि वस्तू खरेदीवर काही वस्तू मोफत, असे अमिष दाखविले होते. या अमिषाला बळी पडून अनेकांनी कंपनीत गुंतवणूक केली होती. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ६५ लोकांनी चार कोटी, ६२ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पण गुंतवणूकदारांना यातून कोणताही फायदा झाला नाही. दरम्यान कंपनीने गाशा गुंडाळला. राज्यभरातही कंपनीने असेच फसवणुकीचे जाळे टाकले.

डिएसके विरूद्ध प्रथम पुण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर राज्यभरातही गुन्हे दाखल झाले. फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. डिएसकेसह त्याची पत्नी व मुलाला काही दिवसापूर्वी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर सांगलीचे पथकाने त्यांचा ताबा घेतला. तिघांना घेऊन पथक पहाटे सांगलीत दाखल झाले. सध्या तिघांची कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Comment