दुबईमध्ये बाल्कनीत न्‍यूड होऊन पोझ देत असलेल्या 12 महिलांना अटक

दुबई । दुबईमध्ये (Dubai) महिलांच्या गटाला कपड्यांशिवाय पेंट हाऊसच्या बाल्कनीत स्टंट करणे महागात पडले आहे. या महिलांना स्टंटबाजीच्या (Stunt) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिला न्‍यूड होऊन बाल्कनीत स्टंट असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे सांगितले जात आहे की, जेव्हा या महिला शहरातील मरिना भागातील बाल्कनीमध्ये स्टंट करत होत्या, त्याच वेळी जवळच्या इमारतीतून कोणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता.

या घटनेमध्ये सुमारे 12 महिलांचा सहभाग होता आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या या गटाचे वर्तन ‘अस्वीकार्य’ असे होते आणि ते युएईची मूल्ये आणि नीति दर्शवित नाही. दुबईच्या कायद्यानुसार ज्या महिलांना अटक करण्यात आली आहे त्यांना 6 महिने कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

इतकेच नाही तर जो कोणी हा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करेल तर त्यांनाही कायद्याच्या सापळ्यात अडकावे लागेल. युएई कायद्यानुसार अश्लील कंटेन्ट शेअर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. अटक केलेल्या महिलांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दुबई पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. या महिलांना पुढील कारवाईसाठी अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

दुबई पोलिसांनी इतर लोकांनाही अशा अशोभनीय वागण्याचा इशारा दिला आहे. या महिलांच्या अटकेचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे आणि मद्यपान केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुरूंगात डांबले गेले. दुबईमध्ये शरिया कायदा अस्तित्त्वात आहे आणि त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागणे हा दंडनीय गुन्हा आहे हे लक्षात घ्या.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like