हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना महामारीचे (Corona) सावट देशावरून गेल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक दैनंदिन जीवन जगू लागले आहेत. मात्र कोरोना गायब झाल्यानंतर देखील त्याचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वैद्यकीय अहवालातून कोरोनामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनामुळे मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे.
कोरोनामुळे मानवाच्या आरोग्यावर कोणकोणते परिणाम झाले या संदर्भात ‘द लॅन्सेट जर्नल’ने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. या संशोधनामधूनच कोरोनानंतर मानवाचे आयुष्य घडले असल्याचे समोर आले आहे. या अहवालात म्हटले आहे की, 1950 साली मानवाचे सरासरी वय 49 वर्षे होते, पुढे 2019 मध्ये ते 73 वर्षांपेक्षा जास्त वाढले, परंतु 2019 साली कोरोना महामारी आल्यानंतर मानवाच्या आयुष्यात घट झालेली पाहायला मिळाली. 2019 ते 2021 दरम्यान, मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 ने घटले. म्हणजेच, कोरोनामुळे जगातील 84 टक्के देशांमधील आयुर्मान घटले vele.
इतकेच नव्हे तर, कोरोना महामारीदरम्यान 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांच्या मृत्यू झालात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच महिलांमध्ये हे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे. जगात 2020 आणि 2021 दरम्यान 13.1 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. यात 1.6 कोटी मृत्यू फक्त कोरोनामुळे झाले. महत्वाचे म्हणजे, याकाळात COVID-19 बालकांच्या मृत्यू दरात घट झाली आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 5 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या मृत्यू दरातही घट झाली आहे.
दरम्यान, या संशोधनामध्ये कोरोनातून बरे झालेल्या लोकांना इतर वेगवेगळे आजार झाल्याचे समोर आले आहे. कोरोनातून बरे झालेले लोक आता वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होत चालले आहेत. म्हणजेच कोरोनाचा मानवाच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे.