करोना व्हायरसची पंतप्रधान मोदींनी घेतली धास्ती; साजरी करणार नाहीत यंदाची होळी, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाची होळी साजरी करणार नसल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. करोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा आधार घेत आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं यंदा होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिलं की,”जगभरातील तज्ञांनी करोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे”. याआधी मोदींनी लोकांना कोरोनापासून न घाबरण्याचं आवाहन करत एक पोस्टर ट्विटवर पोस्ट केलं होत. ज्यामध्ये त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजींबाबत माहिती दिली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment