“फास्टॅगमुळे इंधनावरील खर्च 20 हजार रुपयांनी कमी होईल तसेच महसुलातही वाढ होईल”- नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । महामार्गावरील फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चावर वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही 10,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली. देशभरातील टोल प्लाझावर थेट परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक मॉनि​टरिंग सिस्टम लाँच करताना त्यांनी सांगितले. रस्ता, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की” महामार्गावरील प्रवास आणखी सुदृढ करण्याच्या दिशेने हे पाऊल आहे.”

माध्यमांना संबोधित करताना गडकरी म्हणाले,”फास्टॅग मार्गे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टोल कलेक्शन केल्याने टोल प्लाझावरील विलंबापासून मुक्तता मिळाली आहे. यामुळे इंधनाच्या वापरामध्ये वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही दहा हजार कोटी रुपयांची वाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

फास्टॅगच्या माध्यमातून 104 कोटींचा संग्रह
फास्टॅगच्या आवश्यकतेनंतर टोल संकलनात मोठी वाढ दिसून आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की,”फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुलीचा आकडा 104 कोटींच्या पुढे गेला आहे.”

टोलिंगसाठी सरकार नवीन जीपीएस सिस्टम तयार करीत आहे
टोलिंगसाठी नवीन जीपीएस सिस्टमही तयार केली जात असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे महामार्गावर चालणार्‍या वाहनांना केवळ त्यांच्या एंट्री आणि एक्सिटच्या आधारावर पैसे दिले जाऊ शकतात. तथापि, त्यांनी हे स्पष्टीकरणही दिले की,”ही सिस्टम लागू होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागू शकेल.”

टोल प्लाझा वरील विलंबापासून मिळाली मुक्तता
डिसेंबर 2016 मध्ये ई-टोलिंग सिस्टमची ओळख करून दिल्यानंतर ती आता 794 टोल प्लाझावर उपलब्ध झाली आहे. मार्च 2018 मध्ये ते केवळ 403 होते. गडकरी म्हणाले की,”टोल प्लाझाचे लाइव मॉनिटरिंग केल्यास कोणत्याही टोल प्लाझाची स्थिती कशी आहे फक्त हेच सुनिश्चित होणार नाही तर तेथे ट्रॅफिक कसे आहे हे देखील समजू शकेल.” ते पुढे म्हणाले की,”टोल प्लाझावर आता एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो आहे.”

इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन 93 टक्क्यांपर्यंत पोहोचले
जयपूर टोल प्लाझाचे उदाहरण देत ते म्हणाले की,” येथे सरासरी 30 मिनिटांचा उशीर आता कमी होऊन फक्त 5 मिनिटांवर आला आहे. टोल प्लाझापैकी जवळपास 80 टक्के शून्य वेटिंग टाईम आहे. इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन 80 टक्क्यांवरून 93 टक्के झाला आहे.

टोल प्लाझाचे लाइव मॉनिटरिंग इनकम टॅक्स, जीएसटी आणि इतर अनेक विभागांसाठी एक उत्तम साधन ठरणार आहे. सरकार अजूनहि यात सुधारणा करेल. केंद्राने 8 राज्यांना या प्लॅटफॉर्मची सुविधा दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment