होळी आणि धुळवड सणाची सुट्टी असल्याने बाधितांचा आकडा कमी, जिल्ह्यात 191 कोरोनाबाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. होळी आणि धुळवड सणाची सुट्टी असल्याने बाधितांचा आकडा कमी झाला असल्याचे दिसून आले.

कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, अपशिंगे 1, खेड 3, गडकर आळी 2, जकातवाडी 1, देगाव रोड 1, विसावा नाका 1, नुने 1, सदरबझार 4, राधिका रोड 2, देगाव 1, करंजे 1, सासुर्वे 1, अंभेखरी 1, खिंडवाडी 1, संगमनगर 1, मालदन 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 2, मिताल 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, केसरकर पेठ 1, अतित 1, गेंडामाळ 1, वडूथ 1, कोडोली 1, शाहुनगर 1, साई कॉलनी 1,कोंढवे 1,काशिळ 1. कराड तालुक्यातीलकराड 2, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 1, आगाशिवनगर 2, पाल 1, मलकापूर 3, तांबवे 1, कोळेवाडी 2, जाखीनवाडी 1, शनिवार पेठ 5,पवार वस्ती 1, मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शेरे 1, सैदापूर 3, वहागाव 1,गोळेश्वर 1, काले 1, पार्ले 1. पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, गव्हानवाडी 1, माजगाव 5. फलटण तालुक्यातील बिरदेवनगर 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, तरडगाव 1, कोळकी 1, जिंती 2, गिरवी 1, नांदल 1, जाधववाडी 3, बारसर गल्ली 1, बुधवार पेठ 1, भडकमकरनगर 1, मलटण 2, खुंटे 1, संजीवराजे नगर 1, फडतरवाडी 1, सोमवार पेठ 1, साखरवाडी 2, शुक्रवार पेठ 1, नरसोबा नगर 1, गुणवरे 1, काळज 1, सरडे 1, आलगुडेवाडी 1, पाचबत्ती चौक 1, सालपे 1, गोखळी 1. खटाव तालुक्यातील पुसेसावळी 4, बुध 2,पुसेगाव 1, चितळी 1,वडूज 3, गोरेगाव वांगी 1. माण तालुक्यातीलबोराटवाडी 1, दहिवडी 1, गोंदवले खु 1, शिंगणापूर 1, घेरेवाडी 1, पळशी 3. कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, कोरेगाव 6, किरोली वाठार 1. वाई तालुक्यातीलगणपती आळी 3, सोनगिरवाडी 2, रविवार पेठ 1, गंगापुरी 1, सिद्धनाथवाडी 1, धर्मपुरी 1, फुलेनगर 1, वाई 2, यशवंतनगर 1, बावधन 1, भुईंज 1, एकसळ 1. खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, शिरवळ 2, विंग 1, खंडाळा 1. जावली तालुक्यातील जावली 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, मेटगुट 1.

एका बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 65 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सध्या 3 हजार 404 जणांवर उपचार

आजपर्यँत एकूण नमुने -4,02,823 घेतले असून एकूण बाधित -65,153 आहेत. त्यापैकी 59,846 जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर 1 हजार 903 बाधितांचा मृत्यू झाला असून सध्या 3 हजार 404 जणांवर उपचार सुरु आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment