मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने… कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४० व्या दिवशी स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बामणोली प्रतिनिधी | १२ फेब्रुवारी पासून आपल्या विविध मागण्यांसाठी जावळी तालुक्यातील कसबे बामणोली येथे धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. जावली व महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्त बाधित एकूण ७४ गावातील धरणग्रस्तांचे आंदोलन अखेर ४० व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसेच या धरग्रस्तांना शासनाच्या अनेक सोयी सुविधा देखील उपलब्ध होत नसल्याने हे आंदोलन उभारण्यात आले होते.

धरण निर्मितीपासून अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांसाठी अनेक वर्षांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून डॉ.भारत पाटणकर यांचे नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत.मात्र या वेळी बामणोली या ठिकाणी सुरू झालेले आंदोलन हे ऐतिहासिक होते त्याचे असे की प्रामुख्याने कोयना भागासह संपूर्ण भागातील धरणग्रस्तांनी बहुतेक करून महिला व पुरुषांनी लक्षणीय सहभाग घेतला होता.

आंदोलन कालावधीत डॉ.भारत पाटणकर यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाच्या सोबत मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यासोबत धरणग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली व सर्वच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन मिळाले. मात्र तरीदेखील स्थानिक पातळीवरील इतर महत्वाचे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले . समन्यायी विकास सर्वांचा विकास याकरिता सर्व प्रकल्पग्रस्तांनी पंढरपूरच्या विठुरायाला देखील साकडे घातले.

सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी स्वतः डॉ.भारत पाटणकर यांचे उपस्थितीत बैठक घेतली. त्या बैठकित धरणग्रस्तांचे आजवर प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. संकलन याद्यांमध्ये असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून आजवर प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे विविध प्रश्न मार्गी लागणार असल्याने सर्व धरणग्रस्तांनी डॉ.भारत पाटणकर यांचे आभार मानले.

मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री यांचे सचिव व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचेशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे धरणग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर,जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत पन्हाळकर,जावली-महाबळेश्वर अध्यक्ष प्रकाश साळुंखे,वकील शरद जांभळे,हरीचंद्र दळवी,हरिबा संकपाळ आहिर,भगवान भोसले,पांडुरंग गोरे आंबवडे इत्यादी उपस्थित होते.

इतर महत्वाचे –

‘यांच्या’ सोडचिट्टीने काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का…

उत्तर मुंबईत काँग्रेसचा हा ठरणार नवा उमेदवार ?

गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक

Leave a Comment