औरंगाबाद | सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा समृद्धी महामार्ग माळीवाडा ते कोकमठाण पर्यंत जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. शिर्डी आणि औरंगाबाद मधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे. औरंगाबाद वरून शिर्डीला जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. समृद्धीहा मार्ग नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत पालक मंत्री प्रयत्न करत आहेत. हा समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर 117 किलोमीटरच्या मार्गाचा शिर्डीला जाण्यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले.
कोकमठाण ते शिर्डी हे अंतर सहा किलोमीटर एवढे आहे. औरंगाबाद वरून शिर्डी कडे जाणाऱ्या वाहनांना माळीवाडा पासून कोकमठाण पर्यंतच जाता येईल. यानंतर पुढे समृद्धी मार्ग सोडून जाता येईल. हा समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर शिर्डीला जाण्यासाठी फक्त सव्वा ते दीड तास लागतील. यामुळे वेळही कमी लागेल. आणि भाविक औरंगाबाद येथे एखाद्या पर्यटनस्थळी भेट देखील देऊ शकतील. असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दाखवला आहे.