कराड : डंपर – कार अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मुलगीसह आईच्या मृत्यूने शोककळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कुटुंबीयांसमवेत घरगुती कार्यक्रमासाठी सांगली येथे निघाले असताना आष्टा नजीक दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. अपघातात आगाशिवनगर मलकापूर येथील अधिकराव पोळ तसेच त्यांच्या पत्नी व आई यांचा काल मृत्यू झाला होता. तर जखमी मायलेकी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. आज सकाळी उपचार सुरू असताना या मायलेकींचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आगाशिवनगर मलकापूर परिसर शोकसागरात बुडाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ (49), त्यांची आई गीताबाई (70) पत्नी सुषमा (42), भावजय सरिता सुभाष पोळ (35) सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) हे कुटूंबातील इतर व्यक्तीबरोबर शनिवारी सकाळी सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले. ते पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी येथे आले असता त्याच्या गाडीला अचानकपणे पाठीमागून डम्परने धडक दिली.

अपघातात अधिकराव तसेच त्यांच्या पत्नी व आई यांचा काल मृत्यू झाला होता. तर जखमी मायलेकीवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. आज सकाळी उपचार सुरू असताना या मायलेकींचा मृत्यू झाला. सरिता सुभाष पोळ (35) व मूलगी समृध्दी (8) यांच्यावर कोल्हापूर नंतर कृष्णा मध्ये कालपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याने पोळ कूटूंबियावर मोठा आघात झाला आहे. एकाच कूटूंबातील पाच जणांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.