औरंगाबाद – समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात खुलताबाद- फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावरील सराई गावाजवळ आज सकाळी सव्वादहा वाजेदरम्यान घडला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोडी बु. ता फुलंब्री येथील पार्वताबाई शंकर शिंदे (65) या मुलगा ज्ञानेश्वर सोबत दुचाकीवर (एम.एच. 20 सी. पी. 918) खाजगी कार्यक्रमासाठी खुलताबादमार्गे गंगापूर तालुक्यात चालल्या होत्या. सराई गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एम. एच. 12 ई.क्यू. 0765) हुलकावणी दिल्याने ज्ञानेश्वरचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे पार्वतीबाई खाली पडल्या याचवेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेले. यात पार्वताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
खुलताबाद पोलीसांनी पंचनामा केला. त्यानंतर अधिक तपास करत ट्रक पकडला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मसियोद्दीन सौदागर , सराईचे उपसरपंच आदिनाथ नागे, काकासाहेब नागे यानी सहकार्य केले. खुलताबाद पोलीसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोहेकॉ रतन वारे क