कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारानंतर पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा विद्यापीठात कृष्णा कॅन्सर इन्स्टिट्यूट व ऑन्कॉलॉजिक फिजिओथेरपी विभागाच्यावतीने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी “कॅन्सरचे योग्यवेळी निदान झाल्यावर उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो आणि तो पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वास सर्व रूग्णांनी बाळगावा, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभारप्रदर्शन डॉ. तृप्ती यादव यांनी केले.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की अलीकडच्या काळात लोकांमध्ये कर्करोगाबद्दल जागृती निर्माण होऊ लागली आहे. वेळीच निदान व योग्य उपचार झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन रूग्णांनी न घाबरता उपचारास प्राधान्य द्यावे. आपण पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वास रूग्णांनी बाळगावा. रुग्णांनी नियमित तपासणी, तसेच पुरेशी काळजी घ्यावी. यावेळी रुग्णांना व्यायाम साहित्य, औषधे तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे वितरण करण्यात आले.

Leave a Comment