पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI, ‘या’ कॅशलेस डिजिटल पेमेंट सोल्यूशन बद्दल सर्व जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी (e-RUPI) लाँच केले. पंतप्रधान मोदींनी 2 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च केले. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल. e-RUPI एक क्यूआर कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जो लाभार्थीच्या मोबाइलवर डिलिव्हरी केला जातो. या एकवेळ पेमेंट सिस्टीमचे युझर्स कार्ड, डिजिटल पेमेंट app किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये प्रवेश न करता सर्व्हिस प्रोव्हायडरवर व्हाउचर रिडीम करू शकतील.

सध्या e-RUPI आरोग्य सेवांशी जोडला जात आहे
e-RUPI लाँच केल्यानंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की,” सध्या ते फक्त आरोग्य सेवांशी जोडले जात आहे. आता जर एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन लसीकरण करावयाचे असेल तर त्याला e-RUPI च्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्‍शनची सुविधा मिळेल. नंतर ते इतर आरोग्य सेवांसाठी पैसे भरण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.” ते म्हणाले की,”देशात डिजिटल पेमेंटमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.” यासह, लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनांचा लाभ मिळाला आहे. या दरम्यान, त्यांनी Rupay Card आणि Cowin App च्या यशाबद्दल चर्चा केली.

तंत्रज्ञानाला गरीबांना मदत करण्याचे साधन बनवले
पंतप्रधान मोदी म्हणाले की,” पूर्वी आपल्या देशात काही लोकं असे म्हणत असत की, तंत्रज्ञान फक्त श्रीमंतांसाठीच आहे, भारत हा गरीब देश आहे, तर भारतासाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे? जेव्हा आपले सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवण्याविषयी बोलत असे, तेव्हा अनेक राजकारणी, विशिष्ट प्रकारचे तज्ञ त्यावर प्रश्न उपस्थित करत असत. आज त्या लोकांचा विचार नाकारण्याबरोबरच देशाने त्यांना चुकीचे सिद्ध केले आहे. आज देशाचा विचार वेगळा आणि नवीन आहे. आज आपण तंत्रज्ञानाला प्रगतीचे साधन म्हणून गरीबांना मदत करण्यासाठी पाहत आहोत. भारत आज जगाला दाखवत आहे की, तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि त्याच्याशी जोडण्यात ते कोणाच्याही मागे नाहीत. जेव्हा नवकल्पना (Innovations) सर्विस डिलीवरीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तेव्हा भारताकडे जगातील मोठ्या देशांसह जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता असते.

Leave a Comment