आधी दारु पाजली अन् शीर धडावेगळे केले; खुनाचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले 

0
215
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे (55, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृत्यू व्यक्तीला पार्टी देतो म्हणून बोलावून आधी दारू पाजली त्यानंतर गळा चिरून हत्या केली. या हत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत शीर नसलेला मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत ओळख पटवली असता. हा मृतदेह लक्ष्मण यांचा असल्याचं स्पष्ट झाले. शिर धडावेगळे असलेला मृतदेह असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली.

 

दरम्यान लक्ष्मण यांचा धडावेगळे केलेलं मुंडकं आणि कपडे कायगाव टोका येथे आढळून आले. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने पथक तयार केली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here