2020 मध्ये गूगलचे CEO सुंदर पिचाई यांनी केली ‘इतक्या कोटींची’ कमाई; ऐकून तुम्ही पण व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुंदर पिचाई यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना डिसेंबर 2019 मध्ये गूगलच्या मालकीची कंपनी ‘अल्फाबेट इंक’चे सीईओ म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांचे आणखी एक पद वाढले असताना पगारही त्या पोस्टनुसार वाढला. 2020 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून किती रक्कम मिळाली हे आपणास माहिती आहे काय? जर नसेल तर माहिती तर आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. गुगलच्या यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे वार्षिक प्रॉक्सी दाखल केल्यानुसार, 2020 मध्ये पिचाई यांचा बेस पगार $ 3 दशलक्ष (सुमारे 15 कोटी रुपये) होता. अल्फाबेट इंकने आपल्या फाईलिंगमध्ये सांगितले की, 2020 च्या ‘लीडरशिप डेव्हलपमेंट अँड कॉंपेन्सेशन’ने सुंदर पिचाई यांचा पगार दोन दशलक्ष पर्यंत वाढवल्याची माहिती दिली आहे. हे त्यांचे वाढलेले पद पाहता करण्यात आले आहे.

यासह, पिचाई यांना 5 दशलक्ष डॉलर्सची आणखी भरपाई देण्यात आली, ज्यामुळे त्यांचे एकूण कंपनसेशन $ 7.4 दशलक्ष (सुमारे 52 दशलक्ष रुपये) झाले. अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी, 2019 मध्ये पिचाई यांचा पगार सुमारे $ 6.5 लाख होता (सुमारे 4.8 कोटी रुपये). त्याच वेळी, अन्य भरपाईची एकूण रक्कम सुमारे $ 3.3 दशलक्ष होती. या बरोबरच, 2019 मध्ये अल्फाबेट आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्यावर पिचाई यांना 240 दशलक्षांचे स्टॉक पॅकेज देण्यात आले. प्रॉक्सी फाईलिंगनुसार, 2023 मध्ये पिचाईला यांना दिलेल्या स्टॉकवर त्यांची मालकी असेल.

या आहेत जगातील सर्वाधिक पगार मिळवणारी महिला

ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म बेट 365 ची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेनिस कोट्स ह्या आर्थिक वर्ष 2020 मध्ये पगाराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये त्यांनी एकूण 4750 कोटींचे पॅकेज प्राप्त केले जे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 50 टक्के जास्त आहे. डेनिस कोट्स ही ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिला असून गेल्या 10 वर्षात त्यांनी 11,000 कोटींची कमाई केली आहे. कंपनीची एकूण संपत्ती सुमारे 30 हजार कोटी रुपये आहे. त्याच वेळी सन 2020 मध्ये कंपनीला 28400 कोटी महसूल मिळाला जो मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्के कमी आहे.

Leave a Comment