मुलींना येतीये अगदी लहान वयातच मासिक पाळी ; जाणून घ्या कारणे

0
1
Early Periods
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. या सगळ्याचा मोठा परिणाम हा मुलींच्या मासिक पाळीवर होताना दिसत आहे. ती म्हणजे आजकाल खूप लवकरच मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी आठ ते नऊ वर्षांमध्ये मुलींना देखील मासिक पाळी सुरू होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे इतक्या लहान वयात मुलींना मासिक पाळी येणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. परंतु ही मासिक पाळी लवकर येण्यामागे अनेक कारणं आहेत. ती कारणे जाणून घेणे आणि त्यावर तसे उपाय करणे खूप गरजेचे आहे. आता आपण मासिक पाळी वयाच्या लवकर का येते हे जाणून घेऊया.

वंशाचा प्रभाव

मुलींना जर लहान वयात मासिक पाळी सुरू होत असेल तर हा वंशाचा प्रभाव असू शकतो. जर मुलीच्या आई किंवा आजीला लहान वयातच मासिक पाळी सुरू झाली, तर त्याचा थेट परिणाम पुढच्या पिढीवर होऊ शकतो. आणि मुलींना लवकर पाळी येऊ शकते

वातावरणाचा परिणाम

आजकाल लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात अभ्यासाचा ताण असतो. तसेच आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते ताण घेतात. घरात बसूनच अभ्यास करतात किंवा घरातील गेम खेळतात. मैदानामध्ये जाऊन खेळणे बंद झाले आहे. शारीरिक हालचाली त्यांच्या कमी झालेल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलींना कमी वयात मासिक पाळी सुरू होते.

पालकांचा प्रभाव

आजकाल अनेक जोडप्यांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि याचा परिणाम थेट त्यांच्या मुलांवर होत असतो. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. आणि त्यामुळे त्यांची शारीरिक आरोग्यावर देखील होतो. आणि त्यामुळे मुलींना कमी वयातच मासिक पाळी सुरू होते. त्याचप्रमाणे जर लहान वयात एखाद्या मुलीचे शारीरिक शोषण झाले असेल तरी देख लवकर मासिक पाळी येते. त्याचप्रमाणे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील तुम्ही मुलींच्या लवकर मासिक पाळी येण्याला कारणीभूत असतात.

त्याचप्रमाणे अनेक मुली आजकाल तासानंतर मोबाईलवर कंटेंट पाहत असतात. या एडल्ट कंटेनचा देखील प्रभाव मुलींवर होत असत. आणि त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल झाल्याने वेळेच्या आधी त्यांना मासिक पाळी यायला सुरुवात होते.

काय करावं?

मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या शारीरिक हालचालींवर पालकांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांना मानसिक ताण देऊ नये. त्यांना आहारात जास्त सकस अन्न खायला द्यावे. जास्तीत जास्त फळ खायला द्यावी. दूध, दही, पनीर यांसारख्या गोष्टींवर भर द्यावा. जर कमी वयात मासिक पाळी सुरू झाली तर मुलींच्या उंचीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना मैदानी खेळ खेळायला सांगावे.