हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीसोबत त्यांना अनेक आजारांची लागण देखील झालेली आहे. आज काल हृदयविकार, डायबिटीस सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. ज्या लोकांना डायबिटीस किंवा हृदयविकाराचा त्रास असतो. त्यांना कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांच्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले, तर त्यामुळे तुमच्या शरीरावर घातक असा परिणाम होऊ शकतो. आता कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात. हे आपण जाणून घेणार आहोत.
कॉलेस्ट्रॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. जो आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतो. पण जर तो जास्त प्रमाणात वाढला तर तो आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले, तर रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहार योग्य प्रमाणात आणि सकस आहार घेणे खूप गरजेचे असते. यासाठी तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस भाजलेल्या पदार्थांपासूनचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. यामुळे लठ्ठपणा आणि जास्त वजनाचा त्रास होतो. तसेच बैठे जीवनशैली आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने देखील डायबिटीस टाईप 2 यांसारखे आजार वाढतात. आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील यामुळे वाढते.
जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर तुमचे डोळे आणि सांध्याभोवती लहान पिवळसर गाठ किंवा सूज आल्यासारखी दिसते. त्याचप्रमाणे कॉलेस्ट्रॉल वाढले की तुम्हाला अनावश्यक थकवा येतो. तसेच शरीरात निर्माण झालेल्या समस्यांमुळे थकवा जाणवतो. आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच कधी कधी छातीत देखील असह्य वेदना होतात. शारीरिक हालचाली केल्यावर दम लागतो. ही कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणे आहेर. सतत थकवा जाणवतो, छातीत अस्वस्थता जाणवते, त्वचेवर अतिरिक्त चरबी जमा होतेम जर तुम्हाला यातील कोणतीही लक्षण दिसत असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे वय जर 40 पेक्षा जास्त असेल तुम्हाला लठ्ठपणा, डायबिटीस, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या असतील, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची संपर्क साधा.